कोकण रेल्वे कविता








लाल बत्ती
हिरवी
झाली,
आली
कोकण-गाडी आली


कोकण-गाडी
दादा,
आली
कोकण-गाडी 


ठाणे-मुंब्रा-कल्याणाची
ओलांडुन
खाडी


आली कोकण-गाडी
दादा,
आली
कोकण-गाडी.


















जंक्शन आता
मागे
गेले,
पनवेलीचे
ठेसन
आले

ओढ
लावी
कर्नाळ्याची
हिरवीहिरवी
झाडी


आपट्यापासून गाठिल
रोहे,
तयार
ठेवा
नारळ-पोहे

स्वागताला
कोकणवासी
सजले
खेडोपाडी.








































कशासाठी पोटासाठी,
कोकणपट्टी
घाटासाठी

आगीनगाडी
नागीन
जैसी
जाते
नागमोडी

दर्यावरचा
खाईल
वारा,
पिऊन
घेइल
पाउसधारा

बघताबघता
मागे
टाकील
सावंताची
वाडी.
























येथे डोंगर
तेथे
सागर,
नारळ-पोफळ
हिरवे
आगर

कणखर
काळ्या
सह्याद्रीची
थडथडणारी
नाडी

सरता
कोकण
पुढती
जाते,
गोव्यासंगे
जुळवी
नाते

कर्नाटक
अन्
केरळ-तामिळ
प्रेमे
यांना
जोडी.

















कोकणवासी जनतेलाही
भवितव्याची
देते
द्वाही

सुखी
होऊ
दे
गावित-कोळी
कष्टाळू
कुळवाडी

शिंग
तुतारी
झडला
ताशा,
फळास
आल्या
अपुल्या
आशा

कोकणच्या
कैवारी
नाथा,
आशिर्वादा
धाडी.



Konkankatta.in

No comments:

Post a Comment

Instagram